
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्य हनी बाबू यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्ते खटल्याशिवाय अनेक वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असून नजीकच्या काळात खटला सुरू होण्याची शक्यता धूसर असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने हनी बाबू यांचा एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. हनी बाबू यांची पाच वर्षांनी सुटका होणार आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी रोना विल्सन, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्राध्यापक हनी बाबू यांच्यावरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एनआयएने त्यांना जुलै 2020 साली अटक केली होती.
Bhima Koregaon Case: High Court Grants Bail to Professor Hany Babu After 5 Years






























































