Photo – वरळीतील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट येथे आदित्य ठाकरे यांचे महामानवाला अभिवादन

महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट तथा बुद्धविहार येथे राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले.. यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनिल शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.