
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, विभागसंघटक माजी महापौर श्रध्दा जाधव, युवासेना सहसचिव मयूर कांबळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.




























































