
शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलेल्या अनुयायांना अल्पोहार व शीतपेय वाटप करण्यात आले. या उपक्रमाला शिवसेना नेते दिवाकर रावते, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा संघटक रिमा पारकर, शाखा समन्वयक कल्पना पालयेकर, चंद्रकांत झगडे, कार्यालयप्रमुख रमेश सोडये, भटू अहिरे, संतोष घोलपकर, शेखर यादव, सुशांत गोजारे यांच्यासह शाखेतील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चैत्यभूमी येथे येणाऱ्या भीम अनुयायींकरिता शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना आणि सुवर्णकार हस्तकला कामगार सेना अध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार महेश सावंत, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, भटू अहिरे, सीमा लोकरे, अशोक बागडे, विनोद सातपुते, रमेश धाकराव, विजय शेळके, शिवराज साकेत, महेश यादव, गोवर्धन गचांडे आदींनी भेट दिली.
शिवसेना विभाग क्र. 2 च्या वतीने कांदिवली पश्चिम शताब्दी रुग्णालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे यांच्यासह विभागातील पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.





























































