
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव केला. उर्वरित दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या मातब्बर खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. कसोटी मालिकेचं दु:ख बाजूला सारून टीम इंडियाने वनडे मालिका विजय साजरा केला. आता टीम इंडियाची पुढची वनडे मालिका थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 साली खेळली जाणार आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आता 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 9 ते 19 डिसेंबर दरम्यान ही टी20 मालिका खेळली जाणार आहे. मात्र, त्यानंतर थेट जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला वनडे सामना 11 जानेवारी रोजी बडोदा येथे खेळला जाणार आहे. दुसरा वनडे सामना 14 जानेवारी रोजी राजकोट आणि तिसरा वनडे सामना 18 जानेवारी रोजी इंदौरमध्ये खेळला जाणार आहे. वनडे मालिका संपल्यानंतर आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभुमीवर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे. 21 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान टी-20 मालिका खेळली जाणार आहे.


























































