
हिंदुस्थानी महिला संघाची स्टार फलंदाज, उपकर्णधार आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरलंय तिचं लग्न. 23 नोव्हंबरला वडिलांची तब्बेत बिघडल्यामुळे तिचं संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणारं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र, रविवारी (7 डिसेंबर 2012) तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली आणि लग्नासंदर्भातली सर्व चर्चांना कायमचा पूर्णविराम ठोकला.
SMRITI MANDHANA IS BACK 🔥
– She has started the practice for the Sri Lanka T20I series. pic.twitter.com/nawrH7ETnB
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2025
स्मृती आता लवकर मैदानात येणार नाही, अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, स्मृतीने ‘राष्ट्र प्रथम’ या घोषवाक्याला अनुसरून सर्वांना सुखद धक्का देत मैदानात उतरून सरावाला सुरुवात केली आहे. स्मृतीचा नेट्समध्ये सराव करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये 21 डिसेंबरपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या अनुषंगाने स्मृतीने नेट्समध्ये फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना विशाखापट्टणम येथे 21 डिसेंबरला खेळला जाणार आहे. दुसरा टी-20 सामना 23, तिसरा टी20 सामना 26, चौथा टी20 सामना 28 आणि पाचवा टी20 सामना 30 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.


























































