
सोशल मीडियावर यूजर्सकडून शेअर करण्यात आलेल्या चॅट-जीपीटीमध्ये दिसणाऱया या जाहिराती नव्हत्या तर त्या सूचना आहेत, असे स्पष्टीकरण ओपनएआयचे उपाध्यक्ष आणि चॅटजीपीटी प्रमुख निक टर्ले यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. ओपनएआय चॅटजीपीटीवर जाहिरातीची कोणतीही चाचणी करत नाहीय, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत. यात दावा केला जात आहे की, या जाहिराती दाखवल्या जात आहेत. परंतु या जाहिराती नाहीत. काही यूजर्सना सूचना या जाहिरातीसारख्या वाटल्या. त्यामुळे त्यांनी त्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ओपनएआयकडून ज्या सूचना दाखवल्या जात होत्या त्यासुद्धा आता बंद करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. चॅटजीपीटीवर जाहिरातींच्या अफवेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. जर आम्हाला जाहिराती आणायच्या असतील तर आम्ही विचार करून तसे आधीच सांगू, असेही ते म्हणाले.
























































