
मोदी सरकारच्या काळात हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱयांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरवर्षी सरासरी दोन लाख लोकांनी हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडले आहे. गेल्या 14 वर्षांमध्ये सुमारे 21 लाख लोकांनी नागरिकत्व सोडले असून गेल्या पाच वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 21 लाख हिंदुस्थानी लोकांनी परदेशी नागरिकत्व सोडले. वर्ष 2021 नंतर नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीच्या वर्ष 2020 मध्ये हा आकडा 85 हजारांवर होता, मात्र त्यानंतर दरवर्षी सरासरी दोन लाख लोकांनी नागरिकत्व सोडले आहे.
आखाती देशातून 6 हजार नागरिक परतले
सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये आखाती देशातून 5,945 नागरिक हिंदुस्थानात परतले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत माहिती दिली. त्यात इस्रायल आणि इराणमधून ‘ऑपरेशन अजय’ आणि ‘ऑपरेशन सिंधू’ या मोहिमांमधून परतलेल्या नागरिकांचाही समावेश आहे.
वर्ष नागरिकत्व सोडले
2020 85,256
2021 1,63,370
2022 2,25,620
2023 2,16,219
2024 2,06,378


























































