
मोरक्को–अल्जेरिया सीमेवर थंडीने नऊ आफ्रिकन लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये सात पुरुष, तर दोन महिलांचा समावेश आहे. मोरक्कोच्या मानवाधिकार संघटनेने या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. यातील एक प्रवासी गिनीतील होता, तर बाकीचे लोक सब-सहारन आफ्रिकेतील विविध भागांतील होते. मोरक्कोने यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.





























































