मधुमेहींनी आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात, जाणून घ्या

मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं मानलं जातं. मधुमेही म्हटल्यावर फक्त कारलं खायचं असं अजिबात नाही. मधुमेही रुग्णांनी आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे योग्य आहार घेतल्यास, मधुमेह हा कंट्रोल करता येऊ शकतो. योग्य आहार आणि मधुमेहावर मात करण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश आहारात करणे हे खूप गरजेचे आहे.

किचनमधील हा पदार्थ आहे बहुमोली, वाचा याचे खूप सारे उपयोग

शेवग्याच्या शेंगा या मधुमेहींसाठी रामबाण मानल्या जातात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते. शेवग्याच्या शेंगा या भाजी बनवून, सूपमध्ये घालून किंवा सांबारमध्ये घालून त्यांचा वापर करू शकता.

स्नेक गार्ड म्हणजेच पडवळ ही लांबट आकाराची भाजी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते. मुख्य म्हणजे ही भाजी आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच पचन सुधारण्यासोबत मधुमेह आणि हृदयरोग नियंत्रित करण्यास उपयोगी मानली जाते.

रोज किमान एक चमचा जवस का खायला हवेत, जाणून घ्या

परवल ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील एक फायदेशीर भाजी आहे. परवलची भाजी केवळ साखरच नाही तर कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते. अनेक अभ्यासात असेही म्हटले आहे की परवल मेटफॉर्मिनसारखे काम करते.

तोंडली या भाजीला हिंदीमध्ये कुंदुरू असे म्हटले जाते. ही हिरवी भाजी शरीरात इन्सुलिनसारखे काम करते. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, कुंदुरुमध्ये आढळणारे पोषक तत्व यकृतातून ग्लुकोजचे उत्पादन कमी करतात. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी वरदानापेक्षा कमी नाही.

हिवाळ्यात डाळिंबाचा रस त्वचेवर लावण्याचे फायदे, जाणून घ्या

क्लस्टर बीन्स म्हणजेच गवार. गवार ही भाजी तशी दुर्लक्षित मानली जाते. परंतु या भाजीची चव आणि फायदे आश्चर्यकारक आहेत. गवारीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच ही भाजी खाल्ल्याने साखर वाढत नाही.