
मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमीन अमेडिया कंपनीला बेकायदा विकण्यासाठी शीतल तेजवानीचा ऑफिसबॉय चंद्रकांत तिखे याची कंपनीचा पार्टनर म्हणून अभिनिर्णय प्रक्रियेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि अधिकारपत्रावर स्वाक्षरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या अनुषंगाने तेजवानी आणि या ऑफिसबॉयमध्ये झालेले व्यवहार आणि दस्ताच्या देवाणघेवाणीबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी तेजवानीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ करावी, अशी मागणी बावधन पोलिसांनी केली. त्यावर पौड न्यायालयाने तेजवानी हिच्या पोलीस कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.
मुंढवा येथील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणात कुलमुखत्यार शीतल किसनचंद तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात अटकेत असलेल्या तेजवानीला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
तो विषय आता बंद झाला – मुनगंटीवार
मुनगंटीवार यांनी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली होती. यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि पक्षाच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल होते. दरम्यान मुनगंटीवार यांनी राज्यभर दौऱयाचा विषय आता संपला आहे. तो विषय आता बंद झाला आहे. भेटीगाठी होत राहतील, चर्चा होतील, असे सांगत त्यांनी या मुद्दय़ावर अधिक बोलणे टाळले.


























































