
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेली असून आज अर्जाची छाननी सुरू आहे. अशात भारतीय जनता पक्षामध्ये आयारामांमुळे निष्ठावंतांची गोची झाल्याचे दिसून येत आहे. तिकीट वाटप आणि एबी फॉर्मवरून ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक आणि आक्रोश पाहायला मिळाला.
छत्रपती संभाजीनगर येथेही भाजप कार्यालयावर संतप्त पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांनी धडक दिली आणि मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तोंडसुख घेतले. भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी अतुल सावे, भागवत कराड यांची गाडी अडवली. त्याचे फोटो फाडत गाडीला काळे फासले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र सावे यांनी त्यांच्या पीएला तर कराड यांनी नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांना राडा घातला.
तू ह*, तू ह**र! नाराज महिला कार्यकर्त्याने भाजप नेत्यांना वाहिली शिव्यांची लाखोली pic.twitter.com/zVm2HzzO0C
— Saamana Online (@SaamanaOnline) December 31, 2025
भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी भाजप आमदार संजय केनेकर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी नाराजांची समजूत काढण्याऐवजी त्यांच्यावरच दमदाटी केली. भाजप कार्यालयातील नाराजांना बाहेर काढत त्यांनी “तू आता गप्प बस” असा दमही भरला. एवढेच नाही तर इच्छुक उमेदवार प्रशांत बदाने पाटील यांना गाडीत कोंबले आणि पळवून नेले.
मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांचे फोटो फाडले; छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपातील नाराज इच्छुकांचा सलग दुसऱ्या दिवशी राडा, भाजप आमदार संजय केनेकर यांनी नाराज कार्यकर्त्याला गाडीत टाकून पळवून नेलं pic.twitter.com/OHwI8Ea2Js
— Saamana Online (@SaamanaOnline) December 31, 2025


























































