
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रचार सभांमध्ये भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोपांचा सामनाच रंगला आहे. चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यावर अजित पवार यांनी तो मोठा नेता आहे. मोठय़ा नेत्यांनी छोटय़ा नेत्याला एकेरीच बोलायचे असते. तो मोठा नेता असल्यामुळे मी त्याला चिल्लर वाटतोय, असा टोला अजित पवार यांनी महेश लांडगे यांना नाव न घेता लगावला.
सुप्रियाने मला सांगितले मी तुझ्या पाठीशी आहे
महापालिका निवडणुकीच्या प्रचारसासाठी अजित पवार ठाण मांडून होते. परंतु सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार देत म्हणाले, सुप्रियानेच मला सांगितले की, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचे. मी तुझ्या पाठीशी आहेच. अजित पवार यांच्या या मिश्कील उत्तरावर सुप्रिया सुळेंना हसू आवरता आले नाही.


























































