शिवसेनेचे शिलेदार विजयाचा गुलाल उधळतील, पनवेलमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात

झंझावात सुरू आहे. मतदानाच्या प्रचाराच्या तोफा लवकरच थंड होणार असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारराजांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे. ठिकठिकाणी शिवसेना-महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज शिवसेना नेते अनंत गीते यांनी स्वतः पनवेलमध्ये येऊन निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला. उमेदवारांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले. भाजपने सत्ता आणि पैशांच्या जोरावर कितीही मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला तरी पनवेलची सुजाण जनता यावेळी महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभी राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवसेनेच्या खांदा कॉलनी येथील शहर शाखेत झालेल्या आढावा बैठकीत शिवसेना उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, उपशहरप्रमुख प्रशांत महाडिक तसेच शिवसेना उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.