सहा दिवसानंतर सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना सहा दिवसानंतर रुग्णालयातून रविवारी सायंकाळी डिस्चार्ज मिळाला आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सोनिया गांधी यांना 5 जानेवारी 2026 रोजी छातीत इन्फेक्शनमुळे ब्रोंकियल अस्थमा वाढला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारानंतर सोनिया गांधी यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना रविवारी सायंकाळी 5 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून घरीच पुढील उपचार करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे रुग्णालयाचे चेअरमन डॉ.अजय स्वरुप यांनी सांगितले.