
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आंबोली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना घरोघरी भेट देत भाजपचा खोटेपणाचा, भ्रष्टाचाराचा बुरखा फाडत मतदारांना जागे करण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात जाऊ द्यायची नसेल तर मशालीला ताकद द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनिकांनी जास्तीतजास्त घरांना भेट देत आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. शिवतीर्थावरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले सादरीकरण आणि त्यातील संदेतश जास्तीजास्त जनतेपर्यंत पाहचवणे गरजेचे आहे. भाजपकडून आपल्याला नको त्या विषयात गुतंवण्यात येते. ढोल-ताशे, दहीहंही याची, त्याची वेळ वाढवली, हिंदु- मुस्लिम वाद, बांगलादेशींचा विषय यात ते आपल्याला गुंतवतात. आपल्याला अशा विषयात गुंतवत ते आपल्या पायाखालची जमीन अदानी आणि उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आपण या कोणत्याही विषयात अडकू नये. गेली 25 वर्षे आपण जात-पात, धर्म-पंथ न पाहता मुंबईची सेवा केली आणि यापुढेही करत राहणार आहोत. त्यासाठी या दोन दिवसात जास्तीतजास्त घरापर्यंत आपले विार पोहचवा. मुंबई, महाराष्ट्रावर जी ताकद आक्रमण करत आहे, मुंबई महाराष्ट्राची होणार लूट रोखायची असेल तर मशालीशिवाय पर्याय नाही. घोटाळे, भ्रष्टाचार, फसवणूक हे सर्व रोखण्यासाठी आपण मशालीलाच मत देणे गरजेचे आहे, हे घरोघरी जात शिवसैनिकांना पटवावे लागेल. तुम्हाला तुमची ओळख विसरून अदानीस्तान अशी करून घ्यायची नसेल तर मशालीलाच मत द्यावे लागेल. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे मुंबईसाठी एकत्र आले आहेत. मुंबईची ओळख अबाधित ठेवण्यासाठी मुंबईत आपलाचमहापौर आला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.




























































