
ठाणे महापालिकेतील जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. पालिकेच्या वर्धापनदिनीच 25 लाखांची लाच घेताना अतिक्रमणच्या सहाय्यक आयुक्तांना रंगेहाथ पकडले गेले, ही ठाण्याच्या इतिहासातील दुर्दैवी बाब समोर आली. त्यामुळे परिवर्तन करा, ठाणे वाचवा, असे आवाहन शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केले. शहरात डम्पिंग व्यवस्था नाही, स्वतंत्र धरण नाही, वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मिंध्यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर ठाण्याला काय मिळाले, असा सवाल विचारे यांनी केला. ठाणे शहराची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवायची असेल, महापालिका भ्रष्टाचारातून मुक्त करायची असेल तर डोळे उघडून मतदान करा, असे आवाहन विचारे यांनी केले.
सभेला शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसे नेते अभिजित पानसे, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, शिवसेना शहरप्रमुख अनिश गाढवे, मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह शिवसेना-मनसे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






























































