प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार करू शकणार प्रचार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ

state election commission maharashtra

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून उमेदवार घरोघरी जाऊन सर्वप्रकारे प्रचार करत आहेत. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच आज 13 जानेवारीला प्रचाराचा कालावधी संपत असून गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराचा तोफा संध्याकाळी पाच नंतर थंडावणार आहेत. मात्र आज निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत उमेदवार प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही घरोघरी जाऊन कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता, पत्रक न वाटता शांततेत प्रचार करू शकतील असे जाहीर केले आहे,

दि.१३.०१.२०२६ रोजी मा. निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहीता सायं. ५.३० वा. संपणार आहे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार/प्रतिनिधी यांना त्यांचा प्रचार दि.१३.०१.२०२६ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यत करता येईल. परंतु दि.१३.०१.२०२६ ते दि.१५.०१.२०२६ पर्यंत राजकीय पक्ष/अपक्ष उमेदवार यांना त्यांचा प्रचार घरोघरी जावून करता येईल. मात्र सदर राजकीय पक्षांना व त्यांच्या उमेदवार/प्रतिनिधींना पत्रके वाटून प्रचार करता येणार नाही, अशाप्रकारच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या आहेत.