साप चावल्यानंतर चालकाने केले असे कृत्य, उडाला एकच गोंधळ; व्हिडीओ होतोय व्हायरल

मथुरा जनपदमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ईरिक्षा चालकाला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर या चालकाने चक्क तो साप उचलून जॅकेटमध्ये घालून जिल्हा रुग्णालयात पोहोचला. ज्यावेळी त्याने जॅकेट खोलले त्यावेळी एकच खळबळ उडाली आणि रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ईरिक्षा चालकाला सापाने दंश केला. त्यानंतर चालकाने मोठ्या धाडसाने त्या सापाला पकडले आणि त्याला जॅकेटमध्ये टाकले. तसाच तो जिल्हा रुग्णालयाच्या इमरजन्सी वॉर्डमध्ये पोहोचला आणि डॉक्टरांकडे उपचार करण्यास सांगितले. खिशात त्याच्या साप पाहिल्यानंतर उपस्थित आरोग्य अधिकारी आणि रुग्ण दहशतीखाली आले आहेत. रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव सापाला बाहेर सोडल्यास उपचार करण्याचे सांगितल्यावर त्या तरुणाने बाहेर रस्त्यावर येत हंगामा केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रुग्णालय प्रशासनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रिक्षा चालकावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा लक्षात घेता रुग्णालय परिसरातून बाहेर सोडायला किंवा कोणत्यातरी डब्यात सुरक्षित ठेवायला सांगितले. मात्र चालक त्याच गोष्टीवरुन संतापला आणि त्याने डॉक्टरांवर उपचार न केल्याचा आरोप केला. रुग्णालयाच्या बाहेर ईरिक्षाी उभी करुन न रस्ते ठप्प केले.

व्हायरल व्हिडिओमध्ये, ड्रायव्हर संतप्त अवस्थेत रुग्णालय प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहे. तो म्हणाला, “मी अर्ध्या तासापूर्वी येथे आलो होतो. हे लोक माझ्यावर उपचार करत नाहीत.” या गोंधळामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ड्रायव्हरला शांत केले, त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.