
लडाखमधील पांगोंग सरोवराच्या परिसरातून उत्तर प्रदेशचे चार पर्यटक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले सर्वजण 20 ते 26 वर्षे वयोगटातील तरुण असून मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बचाव पथकांकडून या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हे सर्वजण पांगोंग सरोवराजवळ शेवटचे दिसले होते.
चारही तरुण जम्मू आणि कश्मीरला सहलीला गेले होते. तेथून ते लेह-लडाखला गेले. तरुणांनी 9 जानेवारी रोजी पांगोंग सरोवराजवळून पालकांशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यानंतर तरुणांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या पालकांनी 11 जानेवारी रोजी आग्रा येथील सदर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लडाख पोलिसांना कळवण्यात आले. सध्या तरुणांचा शोध सुरू आहे. जयवीर चौधरी (27), शुदांशु फौजदार (25), यश मित्तल (25) आणि शिवम चौधरी (25) अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत.





























































