नागपुरात मतमोजणीसाठी जय्यत तयारी, महापालिकेच्या सर्व प्रभागांतील मतमोजणी एकाच वेळी

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली. मतमोजणीसाठी शहरातील 10 वेगवेगळ्या झोननुसार 10 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ईव्हीएममधील मतमोजणीसाठी 20 टेबल्सची मांडणी करण्यात आली असून, प्रत्येक झोनमध्ये टपाल मतदान मोजण्यासाठी स्वतंत्रपणे 4 टेबल्स ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, नागपूर महापालिकेच्या सर्व प्रभागांतील मतमोजणी एकाच वेळी सुरू केली जाणार असल्याचेही अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.