महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू – संजय राऊत

महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पोहोचले आहेत. यावेळी परदेशात विमानतळावर फडणवीस यांचं पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणे स्वागत झालं. यावरच भाष्य करताना X वर पोस्ट करत संजय राऊत असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत संजय राऊत म्हणाले आहेत की, “पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय.”