अजितदादांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राची हानी, अर्थतज्ञांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी भावना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली आहे.

‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था आणि पृषी आधारित सहकारी संस्थांमध्ये त्यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली होती. साखर कारखानदारांनी आर्थिक शिस्त पाळावी याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. सहकार ही केवळ आर्थिक रचना नसून सामाजिक चळवळ आहे. कारखानदारांनी व्यवसाय आणि राजकारण एकत्र आणू नये अशी त्यांची भूमिका होती. पृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संघ अशा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणास त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यादृष्टीने अनेक निर्णयदेखील घेतले, असे अनास्कर म्हणाले.