Budget-2026 – दरवर्षीप्रमाणेच मोठ्या घोषणा, आत्मनिर्भर भारत हे सरकारचे प्रमुख लक्ष्य…जाणून घ्या अर्थसंकल्पातील घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारने लोकप्रियतेपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिले आहे. सरकारने वक्तृत्वापेक्षा सुधारणांना प्राधान्य दिले आहे. मोदी सरकारने अनिर्णय सोडून निर्णायक कृतीचा मार्ग स्वीकारला आहे. भारताच्या विकास प्रवासात शाश्वत आर्थिक वाढ आणि नियंत्रित महागाई दिसून आली आहे. धोरणात्मक निर्णयांमुळे मजबूत समष्टिगत आर्थिक स्थिरता सुनिश्चित झाली आहे.

भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले असून भविष्यात याबाबत निर्णय घेतली जातील. गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत, असे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आर्थिक विकासदरात वाढ हे आमचे पहिले मोठे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर असल्याचे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केले आहे. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे.

देशात बायोफार्मा विकसीत करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. 4 राज्यांमध्ये खनीज कॉरिडॉर बनवण्यात येणार आहे. सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. केमिकल पार्कचीही उभारणी होणार. ग्रामीण भागातील तरुणांना उत्पन्नाचे साधन देण्यासाठी या नवीन उपक्रमांचा फायदा होणार. मोगा टेक्सटाईल पार्कही उभारणार खादी, हँडलूम क्षेत्रावरही भर देण्यात येणार, तसेच सूक्ष्म गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणार. सर्वसमान्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय असल्याचेही सीतारमण म्हणाल्या.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 12.2 लाख कोटी शहर विकासासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पायाभूत सुविधा वाढणार आहेत. पायाभूत सुवधा फंडची स्थापना करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक मालवाहतुकीचे कॉरिडॉर उभारणार आहेत. पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.