गद्दारांना धडा शिकवा आणि राजापूरात भगवा फडकवा, शिवसेना नेते विनायक राऊत यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि राजापूर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवा आणि गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारात ते सहभागी झाले होते.

आज राजापूर तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जूवाटी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दिनेश जैतापकर जूवाटी पंचायत समिती गणाचे उमेदवार दिवाकर मयेकर, केळवली पंचायत समिती गणाच्या उमेदवार छाया कोकाटे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी माजी खासदार विनायक राऊत यांनी संवाद साधला. त्यावेळी उपस्थित माजी आमदार गणपत कदम, संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, विधानसभा क्षेत्र संघटक तात्या सरवणकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.