
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. आपली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत मातोश्रीच्या कट्टर शिवसैनिकांनी केळशी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साथीने निवडणूक प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे.
केळशी जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी आमखोल येथील गुणाजी महादेव गावणुक तर जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणात शिवसेनेचे दापोली तालुका संपर्क प्रमुख रविंद्र सहदेव धाडवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणातील आंजर्ले, अडखळ, जुईकर मोहल्ला, सारंग ताडील पंचक्रोशीसह वेळवी, कादिवली, साकुर्डे परिसरातील गावांमध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांना येथील लोकांकडून मिळत असलेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता प्रचारात या दोन्ही उमेदवारांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे स्पष्ट चित्र जाणवत आहे. तर केळशी जिल्हा परिषदेच्या केळशी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुषार मोहन रांगले यांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडी म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे केळशी पंचायत समिती गणात आधीच संघटनात्मक असलेले प्राबल्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी म्हणून त्याला मिळालेली मोलाची साथ पाहता केळशी पंचायत समिती गणातही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंचायत समिती गणाचे उमेदवार संयुक्तपणे अधिकच्या मताधिक्याने गद्दारांचे कंबरडे पार मोडून काढतील, असे निवडणूकीतील आजच्या वातावरणाचे स्पष्ट चित्र आहे
जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार रविंद्र सहदेव धाडवे हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाची नाळ या मतदार संघात जोडली गेली आहे. त्यातच महत्त्वाचे म्हणजे या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला पाठिंबा ही या उमेदवारांची मोठीच जमेची बाजू आहे. तर पूर्वी एकत्रित शिवसेनेत पक्ष संघटनेचे काम पाहणारे गुणाजी गावणूक हे शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्ते शिवसैनिकांसह पूर्वीच्या एकसंघ शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने त्यांना जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देऊन त्यांचा शिवसेनेने मोठाच सन्मान केला. आज त्यांना केळशी जिल्हा परिषद गटातील केळशी पंचायत समिती गणात तसेच जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणात मिळणारी लोकांच्या प्रतिसादाची दाद पाहता त्याचा फटका शिंदे गटाला बसणार आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या केळशी जिल्हा परिषद गटात गुणाजी गावणुक यांना तर जुईकर मोहल्ला पंचायत समिती गणात रविंद्र सहदेव धाडवे या शिवसेना उमेदवारांना तर केळशी पंचायत समिती गणात तुषार मोहन रांगले या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना लोकांचा मिळत असलेला उस्फुर्त प्रतिसाद हा निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयाचे तोरण बांधण्यास सज्ज झाला आहे. या सर्वांमागे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उत्तम आणि नियोजनबद्ध राबलेल्या प्रचार यंत्रणेचे हे खरे तर संयुक्त यश असल्याची चर्चा आहे.





























































