मोदी है तो मुमकिन है… जगभरातून 1.68 लाख हिंदुस्थानींना माघारी धाडले; अमेरिका, सौदी, यूएईतून केले हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील पाच वर्षांत (2021-25) एपूण 1,68,665 हिंदुस्थानी नागरिकांची विविध देशांमधून हकालपट्टी करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेसह अन्य देशांतून हिंदुस्थानींना मोठय़ा संख्येने हद्दपार करण्यात आले आहे. कोणत्या देशाने किती हिंदुस्थानींना परत पाठवले, याबाबतची आकडेवारी सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली.

गेल्या पाच वर्षांत अमेरिका आणि इतर देशांतून किती हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतर रोखण्यासाठी पेंद्र सरकारने कोणकोणती पावले उचलली यासंदर्भात काँग्रेसचे खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी प्रश्न विचारला होता. सुरजेवाला यांच्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम आशिया, दक्षिण- पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या काही देशांतून अधिक प्रमाणात हिंदुस्थानींना हद्दपार करण्यात आले.

> गेल्या वर्षभरात सौदी अरेबियाने तब्बल 1.2 लाख हिंदुस्थानींना हद्दपार केले. संयुक्त अरब अमिरातीने 21,310 हिंदुस्थानींना ‘डिपोर्ट ’ केले. त्यामध्ये 2023 नंतर दुबईतून हद्दपारांचा आकडा अधिक आहे.

> मलेशिया आणि कतार येथूनही अधिक हिंदुस्थानींना मायदेशी पाठवण्यात आले. मलेशियाने एक हजार 485, संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) एक हजार 469, बहरीनने 764, थायलंडने 481, पंबोडियाने 305 आणि पॅनडाने 188 हिंदुस्थानींची हकालपट्टी केली आहे.

> युनायटेड किंगडम, चीन, ऑस्ट्रेलिया, कतार आणि इतर देशांनीही अनेक हिंदुस्थानींना मायदेशी पाठवले आहे. 2025 मध्ये अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासांमार्फत न्यूयॉर्पमधून 47, अटलांटा 31, ह्यूस्टन 234, सॅन फ्रांन्सिस्को 49 आणि सिएटल येथून 31 हिंदुस्थानींची हकालपट्टी करण्यात आली आहे.

> अमेरिका, पॅनडा, ब्रिटन येथून एपूण 8518 हिंदुस्थानींना हद्दपार करण्यात आले. त्यातील 4122 म्हणजे निम्मे हिंदुस्थानी नागरिक तर 2025 या वर्षी हद्दपार झाले.

> जेद्दामधील भारतीय महावाणिज्य दूतावासाच्या आकडेवारीचाही यात समावेश असून तिथून तीन हजार 865 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याशिवाय म्यानमारने एक हजार 591 हिंदुस्थानांची हकालपट्टी केली आहे.