
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, शरीराला डिहायड्रेशन, उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही पदार्थ खाणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक हंगामी फळे मिळतात. या फळांमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो. उन्हाळा सुरु होताक्षणी बाजारामध्ये आपल्याला बेलफळ दिसू लागते. हे बेलफळ आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानले जाते.
बेलफळामध्ये थंडावा असतो म्हणूनच त्याला उन्हाळी सुपरफ्रूट म्हणून ओळखले जाते. ते शरीराला थंडावा देते. बेलमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी६ असते, तसेच मुबलक प्रमाणात फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, टॅनिन, कॅरोटीन, थायामिन आणि बीटा-कॅरोटीन असते.
बेलफळामध्ये लोह असते, जे शरीरात लोहाची कमतरता दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास असेल तर बेलफळाचे सेवन करायलाच हवे. तसेच उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रसही पिणे हे उपयुक्त मानले जाते.
बेलफळामध्ये भरपूर कॅल्शियम असते, यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांच्या समस्या टाळण्यासाठी बेलफळ खाणे हे फार गरजेचे मानले जाते.
किडनी आणि यकृताचे आरोग्य राखण्यासाठी बेलफळ हे उत्कृष्ट फळ मानले जाते. मळमळ किंवा उलट्या होत असतील तर बेल फळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
बेलफळ उन्हाळ्यात जितके जास्त सेवन कराल तितके ते अधिक फायदेशीर ठरेल. उन्हाळ्याच्या झटक्यापासून आणि उष्माघातापासून तुमचे संरक्षण होईल. तुम्हाला डिहायड्रेशनपासून देखील रोखले जाईल आणि पोटातील उष्णता कमी होईल.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही बेलफळाचा रस देखील पिऊ शकता. हे फळ शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखले जाते.
निरोगी यकृतासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, जाणून घ्या
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, बेलफळाच्या रसाचे सेवन हे उपयुक्त मानले जाते. या रसामध्ये भरपूर फायबर असते, जे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते आणि भूक लागण्यापासून रोखते.



























































