
घरच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये लावलेली तुळस हळूहळू सुपू लागल्यास चांगले लक्षण मानत नाहीत. तुळस हे घरातील सकारात्मकता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. तुळशीचे अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत.
तुळस लवकर सुपु नये, यासाठी दर 15 दिवसांनी वरची कोवळी पाने काढा. त्यामुळे बाजूच्या फांद्यांची वाढ होते. तसेच महिन्यातून एकदा शेणखत किंवा गांडुळखत द्या. माती सैल करत राहा, तसेच खूप जास्त पाणी देऊ नका.






























































