
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱया तरुणांसाठी शुभवार्ता आहे. रेल्वेने ‘असिस्टंट लोको पायलट’ (एएलपी)च्या 11,127 रिक्त पदांच्या मेगाभरतीला हिरवा कंदील दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने या भर्ती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली असून, लवकरच रेल्वे भरती बोर्डाकडून सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
या भरती मोहिमेंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा ‘दक्षिण पूर्व रेल्वे’ आणि ‘पूर्व तटीय रेल्वे’मध्ये आहेत.
एएलपीसाठी निवड प्रक्रिया याप्रमाणे
n संगणक आधारित परीक्षा टप्पा 1 (सीबीटी 1)
n संगणक आधारित परीक्षा टप्पा 2 (सीबीटी 2)
n कॉम्प्युटर आधारित योग्यता चाचणी (सीबीएटी)
n कागदपत्रे पडताळणी
n वैद्यकीय तपासणी
पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता ः उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा/डिग्री असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा ः उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल (ओबीसी- 3 वर्षे, एससी/एसटी – 5 वर्षे).
वेतनश्रेणी ः ही पदे पे-लेव्हल 2 अंतर्गत असून, सुरुवातीचे मूळ वेतन 19,900 रुपये अधिक इतर भत्ते असणार आहेत.
कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया?
या भरतीची अधिकृत अधिसूचना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मार्च 2026 च्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारांना संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल.
कुठे किती जागा…
मध्य रेल्वे 1,400 पदे
पूर्व तटीय रेल्वे 1,625 पदे
दक्षिण पूर्व रेल्वे 1,531 पदे
ईशान्य फ्रंटियर रेल्वे 1,276 पदे
उत्तर रेल्वे 740 पदे
दक्षिण मध्य रेल्वे 674 पदे




























































