स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावरील आरोप म्हणजे कट, सनातनला बदनाम करण्याचा शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारिका शारदापीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे आरोप सुनियोजित राजकीय कट असल्याचा दावा केला.

स्वामी सदानंद सरस्वती यांच्या मते, सनातन धर्माच्या आचार्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून विशेषतः गौहत्येसारख्या संवेदनशील विषयांवर आवाज उठवला की अशा प्रकारचे आरोप समोर येतात.

ते पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूर परिसरातील पारलीपोस येथील विश्व कल्याण आश्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावरील सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अविमुक्तेश्वरानंद यांची नियुक्ती वैधानिक प्रक्रियेनुसार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. सनातन सिद्धांतांबाबत भूमिका मांडणाऱ्या आचार्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.