भरत कोळी व नीलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई जिल्हा पॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन पॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य लढतीत मुंबई महानगरपालिकेच्या भरत कोळीने ओएनजीसीच्या संदीप देवरुखकरला 19-21, 25-9 व 25-6 असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर दुसऱया उपउपांत्य लढतीत ए. के. फाऊंडेशनच्या नीलांश चिपळूणकरने डी. के. सी. सी. च्या सिद्धांत वाडवलकरवर तीन सेटपर्यंत चालेल्या रंगतदार लढतीत 14-20, 21-16, 25-16 अशी मात करून आपले उपांत्य सामन्यातील स्थान पक्के केले.

 पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल

महम्मद घुफ्रान- सलमान खान (24-12, 25-6), विकास धारिया-दिलेश खेडेकर (25-15, 25-8)

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल

मिताली पाठक – नेहा कुमारी (25-1, 25-0), अंजली सिरीपुरम- रोझिना गोदाद (25-0, 25-10), ऐशा साजिद खान- गौरी सावंत  (25-0, 25-0).