US-Israel attack Iran: अबुधाबीतील ‘बीएपीएस’ हिंदू मंदिरांचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
baps hindu mandir abu dhabi closed temporarily iran israel war impact

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तणाव कमालीचा वाढला आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्याला इराणनेही प्रतिहल्ल्याने उत्तर दिल्याने संपूर्ण आखाती क्षेत्रात सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) प्रसिद्ध ‘बीएपीएस’ (BAPS) हिंदू मंदिर प्रशासनाने मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने यूएई, कुवेत, बहरीन आणि कतारसह अनेक आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागल्याचे वृत्त आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या चिंताजनक परिस्थितीचा विचार करून, बीएपीएस हिंदू मंदिराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ द्वारे मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद राहील, असे जाहीर केले आहे.

मंदिराच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद असले तरी, मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात स्वामींकडून विशेष प्रार्थना सुरू आहेत. या आध्यात्मिक क्षणांमध्ये सर्वांचे संरक्षण, शांतता आणि कल्याणासाठी प्रार्थना केली जात आहे’. प्रशासनाने या अत्यंत कठीण काळात जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून, राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क; विमान सेवा विस्कळीत

इराणच्या प्रतिहल्ल्यानंतर संपूर्ण आखाती देशांनी तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय केले असून हवाई संरक्षण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. यूएई मधील प्रगत संरक्षण यंत्रणेने इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केले, ज्यामुळे मोठी हानी टळली आहे.

दरम्यान, वाढत्या तणावामुळे इंडिगो (IndiGo), आकासा एअर (Akasa Air), कतार एअरवेज (Qatar Airways) आणि एमिरेट्स (Emirates) यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे स्थगित केली आहेत. प्रवाशांना पूर्ण परतावा आणि तिकिटात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. इंडिगोने ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक घडामोडींचा आढावा घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील हवाई हद्दीतून जाणारी काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे तूर्तास रद्द करण्यात आली असून प्रवाशांना प्रवासापूर्वी विमानाची स्थिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

baps hindu mandir abu dhabi closed temporarily iran israel war impact

baps hindu mandir in abu dhabi has been closed for visitors amid security concerns following iran’s retaliatory strikes. flight operations in middle east disrupted. updates on saamana.

Keywords: saamana, samana, samna, daily saamana, सामना, baps hindu mandir abu dhabi news, israel iran war updates, uae security alert, indigo flights cancelled middle east, gulf region crisis marathi news.