Israel Iran War – ओमानमध्ये तेलवाहू जहाजावर हल्ला, एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमानच्या बंदर सुलतान काबूसच्या वायव्य समुद्रात सोमवारी एका तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओमानच्या सल्तनतच्या सागरी सुरक्षा केंद्राच्या मते, मार्शल आयलंडचा ध्वजांकित तेल टँकर MKD VYOM वर मस्कट ग्नेरातच्या किनाऱ्यापासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर एका मानवरहित बोटीने हल्ला केला.

जहाजावर एकूण 21 क्रू मेंबर होते. यात 16 हिंदुस्थानी, 4 बांगलादेशी आणि एका युक्रेनियन नागरिकाचा समावेश होता. हल्ल्यामुळे टँकरच्या मुख्य इंजिन डब्यात आग लागली आणि स्फोट झाला. यात एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सागरी सुरक्षा केंद्राच्या समन्वयकाने सर्व क्रू मेंबर्सची सुरक्षितपणे सुटका केली. पनामा ध्वजांकित व्यापारी जहाज ‘एमव्ही सँडल’ ने सर्व 21 क्रू मेंबरना सुरक्षितपणे वाचवले.