
ICC T20 World Cup 2026 हिंदुस्थानसह, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. सुपर 8 मध्ये ‘करो या मरो’च्या लढतीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमी फायनलचे तिकीट पक्के केले. या विजयासह टीम इंडिया ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक 20 वेळी सेमी फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ बनला आहे.
ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारणाऱ्या संघांमध्ये हिंदुस्थानचा क्रमांक पहिला असून दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 18-18 वेळी सेमी फायनलमध्ये दाखल झाले आहे. मात्र, यंदा ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने जबर धक्का देत स्पर्धेतून बाहेर काढलं. त्यामुळे साखळी फेरतीच ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट झाला. त्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. दोन्ही संघांनी 16-16 वेळा सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. तसेच या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (15) आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंका (11) या संघांचा समावेश आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतून बाहेर फेकले गेले आहेत.

























































