Iran Israel War – महिला फुटबॉल संघाचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, शांत राहून युद्धाचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Iranian womens football team silent protest refuse to sing national anthem

इराणच्या महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाने महिला आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात राष्ट्रगीत गाण्यास नकार देत मूक निषेध नोंदवला. गोल्ड कोस्ट येथील ‘सीबस सुपर स्टेडियम’वर (Cbus Super Stadium) राष्ट्रगीत वाजवले जात असताना इराणी खेळाडूंनी मौन बाळगणे पसंत केले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी, इराणी खेळाडू परंपरेनुसार मैदानात रांगेत उभ्या होत्या. जेव्हा इराणचे राष्ट्रगीत वाजण्यास सुरुवात झाली, तेव्हा एकही इराणी खेळाडू किंवा मुख्य प्रशिक्षक मर्झिये जाफारी यांनी ते गायले नाही. त्याऐवजी सर्व खेळाडू स्थिर उभे राहून समोर पाहत होत्या.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर हा मूक निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इराणची कर्णधार झहरा घानबारी आणि प्रशिक्षक जाफारी यांना खामेनी यांच्या निधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, हा प्रश्न तात्काळ फेटाळून लावला गेला. ईएसपीएनच्या (ESPN) वृत्तानुसार, जाफारी यांनी फारसी भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली, मात्र एएफसी (AFC) मीडिया प्रतिनिधीने त्यांच्या उत्तराचे भाषांतर होऊ न देता मध्येच रोखले.

‘ठीक आहे, मला वाटते तुमच्या प्रश्नासाठी एवढे पुरेसे आहे. विचारल्याबद्दल धन्यवाद. आता आपण केवळ खेळावर लक्ष केंद्रित करूया’, असे मीडिया प्रतिनिधीने प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्यापूर्वी सांगितले.

दरम्यान, प्रत्यक्ष सामन्यात मात्र दक्षिण कोरियाचे वर्चस्व राहिले. चो यू-री हिने पहिल्या सत्रात केलेल्या गोलनंतर दुसऱ्या सत्रात किम ह्ये-री आणि को यू-जिन यांनी गोल डागत दक्षिण कोरियाचा विजय निश्चित केला.

पराभवानंतरही प्रशिक्षक जाफारी यांनी आपल्या ‘टीम मेल्ली बानोवन’च्या (Team Melli Banovan) कामगिरीवर समाधान व्यक्त केले. इराणचा हा केवळ दुसरा आशियाई चषक होता, तर त्यांच्यासमोर १४ वेळा या स्पर्धेत खेळलेला आणि चार वेळा फिफा विश्वचषकात स्थान मिळवलेला दक्षिण कोरियासारखा बलाढ्य संघ होता.

प्रशिक्षक जाफारी म्हणाल्या, ‘आम्हाला कल्पना होती की हा सामना कठीण असेल, कारण कोरिया हा आशियातील सर्वात ताकदवान संघांपैकी एक आहे. त्यांनी खूप चांगला खेळ केला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि आशा करते की आम्ही स्पर्धेत जोमाने पुनरागमन करू.’

‘दुसऱ्या सत्रासाठी आमची खास रणनीती होती आणि आम्ही प्रतिस्पर्ध्यांवर दबावही टाकला; आम्ही बचावात्मक पवित्र्याकडून आक्रमक खेळीकडे वळलो होतो. पेनल्टीच्या वेळी आमच्याकडून वैयक्तिक चूक झाली आणि सेट-पीसवर झालेला गोलही आमच्या खेळाडूच्या चुकीमुळे झाला. परंतु, एकूणच संघाची कामगिरी खूप चांगली होती’, असे त्यांनी नमूद केले.

Iranian womens football team silent protest: refuse to sing national anthem

Iran womens national soccer team made a silent protest at women asian cup by refusing to sing national anthem amid conflict with us and israel.