
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) अंतर्गत रेल्वेत एकूण 22 हजार 195 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. रेल्वेकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख 9 मार्च 2026 पर्यंत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.
आरआरबी अंतर्गत ग्रुप डी अंतर्गत असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रकमन आणि ट्रकमेंटेनर अशी एकूण 22 हजार 195 पदे भरली जात आहेत. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असायला हवा. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्ष असायला हवे. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट असून ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.
























































