रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट या पदासाठी नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांनी मंगळवार, 10 मार्चपासून प्रशिक्षण वर्गाकरिता नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951), संभाजी भोगले (9022415876), आनंद पाटकर (8779851113) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.

ऑफिस असिस्टंट या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rbi.org.in या संकेतस्थळावर रविवार, 8 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवार पदवीधर असावा व त्याला कमीत कमी 50 टक्के गुण असावेत.