
रणवीर सिंहच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच त्याने पेड प्रिह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत पेड प्रिह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 1 लाख 42 हजार तिकिटांची विक्री केली आहे. त्यातून या चित्रपटाने आतापर्यंत 8.83 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच त्याचा सर्वत्र बोलबाला दिसून येत आहे. या चित्रपटाचे एकूण 6684 शोज असून त्यापैकी 6457 शोज हिंदी भाषेत आहेत.




























































