इटावा सफारी पार्कमध्ये पाळणा हलला, निरजा सिंहिणीने दिला चार छाव्यांना जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटावा येथील सफारी पार्कमधून एक अत्यंत सुखद बातमी समोर आली असून, ‘नीरजा’ नावाच्या सिंहिणीने चार गोंडस छाव्यांना जन्म दिला आहे. रविवारी रात्री नीरजाचे बाळंतपण सुखरूप पार पडले असून तिने वेगवेगळ्या वेळी या चार छाव्यांना जन्म दिला. नीरजाच्या आई होण्याने सफारी पार्कमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे नीरजाची ही तिसरी गर्भधारणा असून यापूर्वी तिने दोन वेळा मिळून पाच छाव्यांना जन्म दिला होता.

सफारी पार्कचे संचालक डॉ. अनिल कुमार पटेल यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जन्मलेले चारही छावे पूर्णपणे निरोगी आहेत. माता नीरजा स्वतः आपल्या छाव्यांची योग्य रितीने काळजी घेत आहे. छाव्यांच्या आणि सिंहिणीच्या सुरक्षेचा विचार करता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या या सर्वांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोवीस तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.