Breaking इराणचे प्रत्युत्तर, बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर मोठा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने इराणच्या 90 टक्के तेल खाणी असलेल्या खर्ग बेटावर हल्ला करून तिथले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले. अमेरिकेच्या या कारवाईला इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आङे. इराणने अमेरिकेच्या बगदाद शहरात असलेल्या दूतावासावर ड्रोनने हल्ले केले. बगदादमधील सर्वात सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’ हे दूतावास होते. अशा सुरक्षित भागात घुसून इराणने हल्ला केला आहे.

या हल्ल्यात दूतावासाचे किती नुकसान झाले याची अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र दूतावासावरील हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत दूतावासातून काळा धूर बाहेर पडताना दिसत आहे. या आत्मघातकी ड्रोनने अमेरिकन दूतावासाच्या रडार सिस्टमला व दूतावासाच्या आवारातील हेलिपॅडलाही लक्ष्य केले आहे.