
नाटकाच्या वेळी आपले फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवा असे सुरुवातीलाच सांगितले जाते. मात्र तरिही काही प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात व त्यांचा फोन वाजल्यामुळे कलाकारांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. असाच प्रकार अभिनेता आस्ताद काळेसोबत घडला आहे.
नाटक सुरू असताना फोनवर गप्पा मारणाऱ्या प्रेक्षकांवर अभिनेता आस्ताद काळे भडकला; भर प्रयोगात झापलं! pic.twitter.com/Zo1Do13VMe
— Saamana Online (@SaamanaOnline) March 17, 2026
माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिरमध्ये आस्ताद काळे याच्या सविता दामोदर परांजपे नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्यावेळी एका प्रेक्षकाचा फोन वाजला, त्याने फोन कट करण्याऐवजी कॉल उचलला व बोलून लागला. त्याचवेळी आस्तादचे एक गंभीर सादरीकरण सुरू होते. त्याच व्यत्यय आल्याने आस्ताद प्रयोग थांबवला व त्या प्रेक्षकाव भडकला. ”मी तुमच्याजागी फोनवर बोलतो, तुम्ही माझ्या जागी नाटक करा’, असे आस्तादने त्या प्रेक्षकाला सुनावले. त्यानंतर अस्तादने प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा प्रयोगाला सुरुवात केली.
माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिर येथे व्यावसायिक नाट्य महोत्सव सुरू आहे. याच महोत्सवात आस्ताद काळेच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना हा प्रकार घडला.


























































