
शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉमन ऑफ घेण्यासाठी 8 विद्यार्थ्यांकडून 3 विद्यार्थ्यांचे रॅगिंग होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रॅगिंग करण्यात येत असलेले हे तीन विद्यार्थी या महाविद्यालयातील एफ.वाय. इलेक्ट्रिकल इंजिनिअर या विभागामध्ये शिक्षण घेत आहेत.
याच विभागातील 8 विद्यार्थी एकजूट करुन कॉमन ऑफ घेण्यासाठी मनमानी करुन मानसिक त्रास देत असल्याची माहिती पिडीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. हे आठ विद्यार्थी काही वेळा शिवीगाळ, धमक्या व वादविवादही करतात. त्यामुळे आमच्यावर तणाव येऊन असुरक्षितता निर्माण झाली असल्याबाबतचे निवेदन त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.






























































