चारधाम यात्रा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद, गतवर्षीचा विक्रम मोडीत निघणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारधाम यात्रा येत्या काही दिवसांमध्ये आता सुरु होणार आहे. त्याकरता भाविकांनी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याच्या, अवघ्या 12 दिवसांतच 7 लाखांपेक्षा अधिक नोंदणी झाली आहे. ही नोंदणी ज्या वेगाने होत आहे ते पाहता, यंदा २०२५ मध्ये नोंदवलेला ५१ लाख यात्रेकरूंचा विक्रम यावर्षी मोडला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर्षीची यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होत आहे.

यामध्ये १९ एप्रिलला यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे उघडतील. त्यानंतर २२ एप्रिलला केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडतील. तर २३ एप्रिलला बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले होणार आहेत. २३ मे रोजी शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजे उघडतील. पर्यटन विभागाने ६ मार्च रोजी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली. आकडेवारी पाहिल्यास, दररोज हजारो भाविक मोठ्या संख्येने नोंदणी करत आहेत.

आतापर्यंतच्या नोंदणीमध्ये केदारनाथ धामला सर्वाधिक नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात्रा सुव्यवस्थित करण्यासाठी, राज्य सरकारने ७०% ऑनलाइन आणि ३०% ऑफलाइन नोंदणीचा ​​कोटा निश्चित केला आहे. ऑफलाइन नोंदणी १७ एप्रिलपासून सुरू होईल. हरिद्वार, ऋषिकेश, नयागाव आणि हर्बर्टपूर ही मुख्य केंद्रे असतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भाविकांच्या लांब रांगा टाळण्यासाठी प्रशासनाने यावेळी केंद्रांची संख्या वाढवली आहे.

गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, अंदाजे ५.१ दशलक्ष भाविकांनी भेट दिली होती. यावेळीही, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक अर्ज येत आहेत.