
श्री स्वामी महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोटी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे 4 वाजता स्वामी नामाच्या जयजयकाराने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली.
वटवृक्ष स्वामी मंदिरापासून पहाटे 4 वाजता ‘बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा निघाली. हजारो भाविक नगरप्रदक्षिणेमध्ये सामील झाले होते. पहाटे 5 वा. देवस्थानचे पुरोहित वेदशास्त्रसंपन्न प.पू. मोहन गुरुजी व प.पू. मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रघोषात पहाटे काकड आरती झाली. पहाटेपासून स्वामीदर्शनार्थ मंदिर खुले करण्यात आले. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीने भाविकांसाठी दर्शन व्यवस्था चोख ठेवली होती.

























































