
पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. भारत शिवशंकर सुरवसे व गिरीश सुरेश माळगे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत भारत सुरवसे याचा एप्रिल महिन्यामध्ये विवाह होता.
भारत आणि गिरीश हे दोघे हिप्परगा तलाव येथे पोहण्यास गेले होते. पोहताना गाळात अडकून बुडाले. याची माहिती कळताच दोघांचा शोध घेण्यात आला. भारत याला बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गिरीश याचा शोध सुरू असून, पथक दाखल झाले आहे.


























































