
छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे भरधाव वेगातील स्का@र्पिओने चार महिलांना चिरडले. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 130 वर भिट्ठीकला येथे झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने गाडीच्या चालकाला मारहाण केली आणि महामार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको केला. या वेळी दीड तास तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांब वाहतूककाsंडी झाली होती. पोलिसांनी समजावल्यानंतर प्रकरण शांत झाले. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.
जयपूरमध्ये परदेशी महिलेची तरुणांकडून छेडछाड
जयपूरच्या आमेर परिसरात जपानी महिला पर्यटकासोबत पाच तरुणांनी छेडछाड करण्याची घटना समोर आली आहे. जपानमधून राजस्थान दौऱ्यावर आलेली महिला रविवारी सकाळी जवळपास 8 वाजता जयगड महल पाहण्यासाठी पोहोचली होती. ती महालाजवळच्या गणेश मंदिराकडे जात होती, तेव्हा वाटेत एका निर्जन ठिकाणी पाच मुलांनी तिला अडवले. आरोपींनी परदेशी महिलेसोबत अश्लील चाळे आणि छेडछाड केली.
रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेवर माकडांचा हल्ला
हरयाणातील पानिपत येथून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात एक माकडांचा कळप महिलेच्या पाठीवर चढून तिला ओरबाडत आहे. माकडांनी 50 सेपंद हल्ला केला. या हल्ल्यात पंबर, खांदे आणि चेहऱ्यासह शरीराच्या अनेक भागांवर चावा घेतला. महिलेची किंकाळी ऐपून लोक मदतीसाठी धावेपर्यंत माकडांच्या कळपाने तिला रक्तबंबाळ केले होते. माकडांनी लोकांवर केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहेत. निर्मल देवी (55) घरातून बाजारात जात असताना गल्लीत अचानक तीन माकडांनी हल्ला केला.
अमेरिकेत 32 वर्षांनंतर सापडली हरवलेली मुलगी
अमेरिकेच्या ऑरिझोना राज्यात 1994 मध्ये बेपत्ता झालेली 13 वर्षांची मुलगी क्रिस्टिना मारिया प्लांटे 32 वर्षांनंतर जिवंत सापडली आहे. आता तिचे वय 45 वर्षे आहे. क्रिस्टिना 15 मे 1994 रोजी तिच्या घरातून बाहेर पडली होती, परंतु त्यानंतर ती अचानक गायब झाली. तिचे नाव अमेरिकेच्या मिसिंग चिल्ड्रेन डेटाबेसमध्ये नोंदवले गेले आणि कालांतराने हे प्रकरण कोल्ड केस बनले. आधुनिक तपासासह तिच्या प्रकरणाचे पुन्हा पुनरावलोकन केले असता नवीन सुगावे मिळाले आणि शेवटी प्लांटेला शोधण्यात आले. अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा विचार करून अधिक माहिती दिली नाही.




























































