
एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपला इंधन अधिभार वाढवला आहे. जागतिक बाजारात विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2026 पासून लागू होतील. जागतिक पातळीवर जेट इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. मार्चच्या अखेरपर्यंत जेट इंधनाची सरासरी किंमत प्रति बॅरल 195.19 डॉलरवर पोहोचली आहे. जेट इंधनाची सरासरी किंमत फेब्रुवारीच्या अखेरीस 99.40 डॉलर होती.
इंधन अधिभार म्हणजे तो अतिरिक्त शुल्क, जो एअरलाइन पंपनी पेट्रोल/डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तुमच्याकडून आकारते. इंधन अधिभारचा सुधारित दर 8 एप्रिलपासून देशांतर्गत, तर 10 एप्रिलपासून प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू होईल. एअर इंडियाने घरगुती विमानांसाठी एकसमान अधिभार (फ्लॅट सरचार्ज) व्यवस्था रद्द केली आहे. आता प्रवाशांना अंतरावर आधारित पैसे द्यावे लागतील. हा अधिभार प्रति प्रवासी, प्रति सेक्टर 299 रुपयांपासून सुरू होऊन 899 रुपयांपर्यंत जाईल. हा नियम एअर इंडियासोबतच तिची सहयोगी एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसलाही लागू होईल.परदेशी मार्गांवर इंधन अधिभाराचे दर आणखी जास्त ठेवण्यात आले आहेत. कारण तेथे इंधनाच्या किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसते. सार्प देशांसाठी हे शुल्क 24 डॉलरपासून सुरू होईल.
देशांतर्गत मार्गांसाठी सुधारित इंधन शुल्क मार्ग/अंतर सुधारित शुल्क
0 – 500 किमी रुपये 299
501 – 1,000 किमी रुपये 399
1001 – 1,500 किमी रुपये 549
1501 – 2,000 किमी रुपये 749
2,000 किमीपेक्षा जास्त रुपये 899
अन्य देशांवरील अधिभार
सिंगापूर ः 60 डॉलर
पश्चिम आशिया ः 50 डॉलर
दक्षिण पूर्व आशिया ः 100 डॉलर
आफ्रिका ः 130 डॉलर
युरोप आणि यूके ः 205 डॉलर

























































