
‘केडी ः द डेविल’ चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी’ गाण्यावरून अभिनेत्री नोरा फतेही चांगलीच अडचणीत सापडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनावणीला दांडी मारल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. नोरा फतेहीच्या अनुपस्थितीमुळे संतापलेल्या आयोगाने तिला आता 27 एप्रिलला हजर राहण्याची शेवटची संधी दिली आहे.


























































