नितीश कुमार यांना भाजपने धोका दिला, अखिलेश यादव यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. “मी अशी इच्छा व्यक्त केली होती की नितीश कुमार यांनी पंतप्रधान म्हणून निवृत्त व्हावे. आमच्या ‘इंडिया’ आघाडीतील अनेक सहकाऱ्यांचीही हीच इच्छा होती,” असे यादव म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सध्याच्या घडामोडींवरून मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे. “आता असे वाटते की ते राज्यसभेचे सदस्य म्हणूनच निवृत्त होतील,” असे त्यांनी नमूद केले. अखिलेश यादव यांनी या पार्श्वभूमीवर भाजपवर आरोप करत म्हटले की, “नितीश कुमार यांच्यासोबत भाजपने विश्वासघात केला आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.